``आईना-ए-ग़ज़ल``
रविवार १८ जून २०२३ - पुणे
गझलच्या “अथ” पासून “इति” पर्यंतचा फारसी, उर्दू, हिंदी, मराठी भाषा, अनेक प्रांत, भावना, सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतरे, आणि शायरांच्या मुशाफिरीतून झालेला एक श्रीमंत पण आडवळणाच्या वाटेचा प्रवास, खुमासदार अभ्यासपूर्ण चर्चेतून आणि बहारदार संगीतातून उलगडणारी उत्तुंगसंध्या अर्थात “सा” निर्मित, “पारिजात फाऊंडेशन” प्रस्तुत, उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट आयोजित, “आईना-ए-ग़ज़ल”.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४०व्या जयंतीनिमित्त, तसेच ``अनादि मी, अनंत मी`` नाटकाच्या ४० वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विशेष प्रयोग आणि आनंद सोहळा
शनिवार २७ मे २०२३ - विलेपार्ले
स्वातंत्र्यवीर सावरकर १४०व्या जयंतीनिमित्त, तसेच “अनादि मी, अनंत मी” नाटकाच्या ४० वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विशेष प्रयोगाला आणि आनंदसोहोळ्याला, अनेक मान्यवर रसिक आणि कलाकारांच्या उपस्थितीमुळे वेगळीच झळाळी लाभली.
त्याबरोबरच १९८३ साली सादर झालेल्या मूळच्या प्रयोगापासून, नाटकाशी संलग्न असलेले आमच्याच कुटुंबाचा एक भाग असलेले ज्येष्ठ कलाकार ह्याप्रसंगी उपस्थित असल्यामुळे आमचा उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला. ज्येष्ठ उद्योजक दीपकजी घैसास, ज्येष्ठ रंगभूमी/मालिका/चित्रपट अभिनेते प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर, ईला भाटे, अभिनेत्री दीप्ती भागवत, मालिका/चित्रपट दिग्दर्शक वैभव चिंचाळकर, ज्येष्ठ गायक पंडित राम देशपांडे, युवा पिढीच्या सुप्रसिद्ध गायिका गौरी पाठारे, ज्येष्ठ व्हायोलिन वादक मिलिंद रायकर ह्यांच्यासारख्या जाणकार प्रेक्षकांसमोर, नाटकाच्या निर्मितीची स्मरणरंजनयात्रा म्हणजे दुग्धशर्करा योग.
ह्या नाटकाच्या निमित्ताने स्वा.सावरकर जीवनदर्शन घडवताना,आईबाबांच्या ह्या अजरामर कलाकृतीची गाडी, आमच्या समविचारी तरुण सहकाऱ्यांच्या संपूर्ण मदतीने, आताच्या युवा पिढीपर्यंत आमच्या परीने पुढे नेता येत आहे, ह्याबद्दल मनस्वी आनंद आणि समाधान आहे.
ही कलाकृती स्वा. सावरकरांच्या विचार आणि साहित्यासारखीच “अनादि आणि अनंत” राहो हीच प्रार्थना.
``मिश्किली`` - कवितेच्या वाटेने अर्थात विडंबन-हास्य-थट्टा-गप्पा एक काव्ययुक्त संवाद
रविवार २३ एप्रिल, संध्या ६ वाजता
उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट, पुणे शाखा आयोजित “मिश्किली”
सादरकर्ते:
कविवर्य अशोक नायगावकर आणि अरुण म्हात्रे
एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे