Photo Gallery

उत्तुंग ठाणे शाखा आयोजित, “गुरुबानी” – गुरु-शिष्य परंपरेचा अनोखा मिलाफ.
२७ जुलै २०२४. सायंकाळी ५ वाजता. सहयोग मंदीर, ठाणे

उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट,ठाणे शाखा
सहर्ष सादर करीत आहे
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्येष्ठ गुरुजनांच्या सहवासात आणि त्यांच्या आशीर्वादाने परिपूर्ण अशी एक संगीतमय संध्याकाळ – ‘गुरुबानी’ गुरु-शिष्य परंपरेचा अनोखा मिलाप.
सादरकर्ते:
अनिरुद्ध गोसावी- हार्मोनियम
मैत्रेयी दांडेकर – कथ्थक नृत्य
अदिती कोरटकर- शास्त्रीय गायन
विशेष उपस्थिती:
गुरु पंडित. श्री. सुधीर नायक
गुरु नृत्यालंकार सौ. मनाली देव
गुरु पंडिता श्रीमती. शुभदा पराडकर
उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट - २९वा वर्षपूर्ती सोहळा
७ जुलै २०२४ - पुणे

महनीय व्यक्तिमत्वांच्या सहवासात, आपुलकीच्या ओलाव्याने भिजलेला, हृद्य उत्तुंग सन्मान समारोह

अध्यक्ष:
विद्यावाचस्पती डॉ. शंकरराव अभ्यंकर

सन्मानमूर्ती:
एअर मार्शल (निवृत्त) प्रदीप बापट
विख्यात चित्रकार वासुदेवजी कामत
अभिनेत्री, लेखिका अपर्णा चोथे

कविवर्य पद्मश्री बा. भ. बोरकरांच्या काव्यरसग्रहणाचा आशयघन आविष्कार – ” घन वरसे रे ”
बाकीबाबांचे पुतणे कवी डॉ. घन:श्याम बोरकर आणि सुकन्या सौ. तेजश्री बोरकर-दीक्षित.
रसिकांनी गौरविलेले श्रीमंत सादरीकरण

सूत्रसंचालन: स्नेहल दामले

फोटो सौजन्य: अरविंद देशपांडे, Nikhil Ad

``नाट्यदर्पण रजनी संस्मरण``
रविवार २८ एप्रिल २०२४ - ठाणे शाखा

मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासातील एक सोनेरी पान म्हणजे नाट्यदर्पण रजनी. त्याचा २५ वर्षांचा सुवर्णकाळ अनुभवण्याकरीता निवडक भागांचा दृकश्राव्य ( ऑडिओ -व्हिजुअल ) कार्यक्रम
``नूर-ए-अख्तरी``!
शनिवार 20 जानेवारी २०२४ - पुणे शाखा

सेतू अभिवाचन मंच प्रस्तुत,
“नूर-ए-अख्तरी”!

“गझलसम्राज्ञी बेगम अख्तर ह्यांचा जीवनपट साकारणारं एक भावस्पर्शी संगीतमय अभिवाचन”

संध्या 6:30 वाजता, न्यू इंग्लिश स्कूल सभागृह (गणेश हॉल), टिळक रोड, पुणे